एक शेतकरी असतो ..त्याला एक खूप सुंदर मुलगी असते.तिचं नाव त्याने ठेवलेले अलबेली.. अलबेली खूपच सुंदर फुलासारखी कोमल,निळ्या डोळ्यांची,गुलाबी ओठांची,नाजुकशी..एकदम परी सारखी..सर्वांना वाटायची ती खरंच परी आहे की काय ? खरंच ती शेतकऱ्याची मुलगी आहे अस कोणालाच वाटत नसे. शेतकरी तिच्यावर खूप प्रेम करी.तिची आई ती लहान असतानाच वारली त्यामुळे..शेतकरी एकटाच तिला सांभाळी..तिचे खूप लाड करी ..प्रेमाने तो तिला आलू म्हणे.. आलू फार प्रेमळ होती ..ती सर्वांशी खूप नम्र पणे वागे.. तिचा तिच्या बाबांवर फार जीव..आलू घरातली सर्व कामे करी..शेतकरी शेतात जाऊन काम करी ..बाजारातून आलू ला आवडणाऱ्या सर्व गोष्टी आणून देई.दोघे ही खुशीत जीवन जगत होते. आलू च घर