सुवर्णमती - 15

  • 6.6k
  • 2.5k

15 इकडे शेषनाग आणि राणीसरकारांना हे कसे पटवून द्यावे हे समजत नव्हते. तिने सूर्यनागाशी याविषयी बोलण्याचा प्रयत्न केला होता पण मधेच बोलावणे आल्याने बोलणे होवू शकले नव्हते. आता तर तो फारसा मोकळाही भेटत नव्हता. नृत्याची तालीम करताना तर, दोघेही, त्यावेळी होणाऱ्या शारीरिक जवळीकीने इतके अस्वस्थ होत, की नंतर नजरेला नजरही देत नसत एकमेकांच्या. शेवटी धीर एकवटून ती शेषनाग आणि राणीसरकारांशी बोलण्यास गेली. सूर्यनागास तिथे उपस्थित पाहून आधार आणि भीती दोन्हींनी मनात घर केलं. पण आता घाबरून चालणार नव्हते. शेवटी तिने बोलण्यास सुरवात केली. "पिताजी, अत्यंत नाजूक आणि महत्वाच्या विषयावर आपणा दोघांसोबत बोलायचे आहे.” सूर्यनागाचे कान अर्थातच टवकारले. “बोला बहुराणी,