12 सकाळी दरवाजावर टकटक झाली आणि सुवर्णमती दचकून उठली. भरभर दरवाजाजवळ जात कोण आहे याचा कानोसा घेतला. बाहेर तिची सेविका आली होती. ‘राणीसरकारांनी चुल्हापूजनासाठी स्नान आटोपून बोलावले आहे, दरवाजा उघडावा’ असे तिने विनवताच ‘कुंवर निजले आहेत, मी तयार होऊन येते’ असे सुवर्णमतीने आतूनच सांगून तिला जायला सांगितले. पार न पडलेल्या सुहागरातीचे गुपित ती तिच्या बाजूने तरी गुपितच ठेवणार होती. पुढील काही दिवस, छोटे मोठे कार्यक्रम, रितीरिवाज, यात पार पडले. यासर्व कार्यक्रमांदरम्यान सुवर्णमतीचे हसून खेळून सर्वांशी वागणे, कोणी चेष्टा मस्करी केली तर प्रसंगी लाजणे, हे सर्व पाहिल्यावर, ही एक उत्तम अभिनेत्री असल्याची गवाहीच सूर्यनागास मिळाली. तो अधिकच सतर्कतेने तिच्या आसपास