सुवर्णमती - 11

  • 6.7k
  • 2.8k

11 शेषनगरीही नव्या बहूच्या स्वागतासाठी सजली होती. गुढ्या, तोरणे, कारंजी आणि खास शेषनगरीचे वैशिष्ट्य असलेल्या मोठमोठ्या गालिचांच्या रांगोळ्या. इथली भव्यता निराळीच होती. ‘आपल्या महालास लाजवतील, अशा भव्य, इथल्या दरबाऱ्यांच्या कोठ्याच आहेत.’ सुवर्णमतीच्या मनी आले. राजमहाल दुरूनच दिसू लागला. रात्रीच्या काळोखात त्यावर केलेली रोषणाई पाहून डोळे दिपून जात होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूस उभे राहून, नगरवासी जयजयकारात नव्या बहूचे स्वागत करत होते. सगळीकडे जल्लोष सुरू होता. महालात पोहोचताच नव्या बहूस प्रथेप्रमाणे कुंकुमजलात पाऊले बुडवून आत येण्यास राणीसरकारांनी सुचवले. तसेच तळहात कुंकुमजलात बुडवून तिच्यासाठी राखून ठेवलेल्या भिंतीवरील कोनाड्यात उमटवण्यात आले. आता एकच कोनाडा रिता उरला, चंद्रनागाच्या बहूचा! नंतर थोडेसे जलपान झाले