तुझी माझी यारी - 11

  • 9k
  • 3.5k

दिवाळी नंतर शाळा सुरू झाली पणं आता सगळेच शिक्षक खूप स्ट्रिक्ट वागू लागले..बोर्ड एक्साम जवळ येत होत्या त्यामुळे ..सुट्टी दिवशी ही तास घेणं ..सराव पेपर सोडवून घेणं..फक्त अभ्यास एके अभ्यास सुरू होता...मुलांना थोडी ही उसंत मिळेनाशी झाली होती.अंजली व तिचा ग्रुप ही अभ्यासाच्या तयारीला लागला होता. पास होऊन सगळ्यांनी एकाच कॉलेज ला ॲडमीशन घ्यायच अस ठरल होत ... भले ही एकच शाखेला नसलं तरी कॉलेज एकच असल की सोबत जाता येईल ...कॉलेज मध्ये ही एकत्र असू अशी आशा. बोर्ड एक्झाम अगोदर दहावीच्या मुलांचा निरोप समारंभ ठेवण्यात आला होता .सर्व मुलींनी मिळून साडी घालायचं ठरवल होत.मुल आपली जीन्स टी शर्ट वर