मित्रांचे अनाथाश्रम - भाग २

  • 15.7k
  • 6.7k

मी बेशुद्ध झालो, डोळे उघडले ते सुध्दा दवाखान्यात आणि समोर बाबा, आई, काकू आणि रजनी होते. डॉक्टर बाबांना काहीतरी सांगत होते. डॉक्टर," रक्तपुरवठा करावा लागला, आमच्याकडे त्याचा साठा नव्हता म्हणून जो घेऊन आला त्यानेच रक्त दिले."बाबा," कोण आहेत ते ?"डॉक्टर," इतक्यात इथेच होता, नंतर कुठे गेला काय माहिती ?"माझ्याकडे पाहून बाबा," आता बरं वाटतं ना ?"मी मान हलवून होकार दाखवला. एक आठवडा मी दवाखान्यात होतो, पूर्ण बरा झालो तेव्हाच मला डॉक्टर ने घरी जाण्याची परवानगी दिली. मी जाण्यासाठी नुकताच बेडवरून उठलो, बॅग भारत होतो. काकू जवळच होत्या, बाबांना काम होते आणि बाकी पोरांची काळजी म्हणून आई घरीच होती. काकू बाहेर निघत