लहान पण देगा देवा - 8

  • 7.1k
  • 2.6k

भाग ८ अथर्व- आजोबा कुठे आहेत (दारातून आत येत) आजी तू पण ये कुठे आहेस? आजोबा- काय रे काय झालं दोघांना एकत्र बोलवत आहेस, ठीक आहे ना सगळं, आणि तू तर साक्षी ला भेटायला गेला होतास ना ? काय भांडण झालं कि काय दोघात जे तिची तक्रार घेऊन आलास. अथर्व- आजोबा काय तुम्ही पण, आम्ही लहान राहलोत का आता, आणि आमच्यात काही भांडण वगैरे नाही झालं. मला तुमच्या दोघांशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणून बोलवतो आहे तुम्हाला. आजी- असं काय महत्वाचं बोलायचं आहे , जायला निघालास कि काय लगेच? आणि असा लगेच निघणार आहेस कि काय? अथर्व-