शेवट गुन्हेगारीचा..….. - (भाग-३)

  • 5.4k
  • 2.4k

सकाळी व्यंकट घरी जातो झाल्या घटनेविषयी कोणालाच काहीही सांगत नाही, घरात अजून हैद्राबादला जाण्याच्या वार्ता सुरू असतात, इतक्यात तिथे विरुभाई येतो आणि हैदराबादचे सगळे पाहुणे आणि रमय्याला एकत्र बसवतो आणि त्यांना समजावतो इथे उभा केलेला धंदा, व्यंकटच भविष्य यासाठी मुंबईतच रहाणे कसे महत्वाचे आहे आणि राघूभाई कसे त्यांच्या सोबत आहेत हे सगळे समजावल्यावर रमय्या आणि व्यंकटला मुंबईत ठेवायला सगळे तयार होतात.दुसऱ्या दिवशी सगळे पाहुणे रमय्या आणि व्यंकटला निरोप देऊन परत जातात. दोन दिवसांनी ते दोघे मिळून इडली वड्याची गाडी पुन्हा सुरू करतात, हॉटेल बंदच असते तीन चार दिवस झाले तरी हॉटेल बंदच होते म्हणून रमय्या सहजच व्यंकटजवळ विषय काढते