नवदुर्गा भाग ७ ही देवीच आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते. या देवीचे आठ हात आहेत, म्हणूनच त्यांना अष्टभुजा म्हणतात. त्यांच्या सात हातात अनुक्रमे कमंडल, धनुष्य, बाण, कमळ-फूल, अमृत-आकाराचे कलश, चक्र आणि गदा आहेत. आठव्या हातात सर्व सिद्धि आणि निधी देणारी जपमाळ आहे. या देवीचे वाहन सिंह आहे आणि सिंहावर त्यांचे प्रेम आहे. या देवीला कोहळ्याचा बळी प्रिय आहे . संस्कृत मध्ये कोहळ्याला कुष्मांड म्हणतात म्हणून देवीचे नाव कुष्मांडा या देवीचे वास्तव्य सूर्यमंडलाच्या अगदी आतील लोकात आहे . सूर्यलोकात राहण्याची शक्ति किंवा क्षमता ही फक्त या देवीमध्ये आहे. म्हणूनच देवीच्या शरीराची कांति आणि प्रभा सूर्याप्रमाणे दैदीप्यमान आणि तेजस्वी आहे . त्याच्या