नवदुर्गा भाग २ देवीच्या नऊ रूपांची पूजा करणे म्हणजेच नवरात्र साजरे करणे नवरात्र हा नऊ रंग आणि नऊ दिवसांचा अत्यंत उत्साहवर्धक सण...!! शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव असुन ते देवीशी संबंधित व्रत आहे. हिंदु धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणजे ते शरद ऋतूच्या प्रारंभी येते. आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून , नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव. निसर्गाने पावसाळ्यात