तुझी माझी यारी - 9

  • 9.5k
  • 3.6k

सरूच बोलणं ऐकून अंजली चे डोळे विस्पारतात . अंजली :सरु तुला काय वेड लागलंय का ? खर बोलतेस ना तू ? की माझी गम्मत करत आहेस ? सरु आता तोंड बारीक करून बोलते. सरु : खरचं.. अंजली : पणं सरु ..तू मला एकदा ही बोलली नाहीस ? आणि कसली बेस्ट फ्रेन्ड बोलतेस ? अशीच असते का बेस्ट फ्रेन्ड ? छोट्या छोट्या गोष्टी साठी सुद्धा तुला मी आठवते आणि आता इतकी मोठी गोष्ट तू मला सांगितली नाहीस ? खरचं मला विश्वास च बसत नाही. सरु : अंजली ..मी तुला सांगणार होते.. अंजली तिचं बोलण मध्येच तोडत विचारते .. अंजली : कधी