गोट्या - भाग 8

  • 7.2k
  • 2.5k

डी. एड. चे दोन वर्षे अगदी मजेत सरले. प्रथम श्रेणीत गोट्या पास झाला. त्याला आता नोकरीची प्रतीक्षा होती. त्यासाठी त्याला निवड मंडळाची परीक्षा पास होणे गरजेचे होते. त्यातल्या त्यात त्याच्या संवर्गासाठी खूपच जागा कमी राहत असत. त्यामुळे त्याला जास्त अभ्यास करणे आवश्यक होते. त्याच्या अनेक मित्रांनी जिल्ह्याच्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्रात जाऊन अभ्यास करू लागले तर गोट्या आपल्या गावी राहून अभ्यास करू लागला. अभ्यास म्हणजे काय ? गावातील मुलांना तो सर्व विषय शिकवू लागला. यात त्याचा दुहेरी फायदा होत होता एक तर त्याला शिकविण्यासाठी अभ्यास करावे लागायचे आणि शिकविताना तीच माहिती परत एकदा सांगितल्याने त्याचे दृढीकरण होत गेले. त्यामुळे त्याचे