संतश्रेष्ठ महिला भाग २० - अंतिम भाग

  • 9.7k
  • 1
  • 2.5k

संतश्रेष्ठ महिला भाग २० यानंतरची श्रेष्ठ संत आहे रंगनायकी आंदाळ आंदाळ ही बारा प्रसिद्ध आळवार संतांमधली एकमेव स्त्री-संत. आंदाळ या शब्दाचा अर्थ आहे, देवावर सत्ता गाजवणारी, देवाची प्रियतमा !!! आंदाळची भक्तीची वाट आत्यंतिक प्रेमाची आहे. ते आहे एखाद्या कुमारिकेचे पहिले निष्कलंक प्रेम. तिला तामिळ भूमीने “श्रीरंगाची प्रिया-रंगनायकी” म्हणून गौरवलं आहे. श्री वेलीपुत्तूर हे तामिळनाडूमधलं एक लहानसं गाव आहे. तिथे रंगनाथाचे एक प्राचीन मंदिर आहे. या रंगनाथाची रोज सकाळची पहिली पूजा इतर देवस्थानांतल्या पूजेपेक्षा अगदी वेगळी केली जाते. जवळच्या आंदाळच्या (जी तामिळनाडूची प्रसिद्ध संत-कवयित्री) मंदिरात तिची पूजा आधी केली जाते. आणि तिच्या गळय़ातून उतरवलेला हार वाजतगाजत विधीपूर्वक रंगनाथाच्या मंदिरात आणून तो