चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची... (भाग - ६)

(12)
  • 10.4k
  • 3.9k

घराच्या दिशेने जाताना अचानक मुग्धाची पाऊले थांबली. हृदयाची जलद गतीने होणारी धडधड तिला तीव्रपणे जाणवू लागली. जणू हर्ष इथेच कुठेतरी जवळपास आहे, असे तिचे मन तिला सांगू लागले. खरंतर असे का होत आहे, याचे उत्तर तिच्याकडेही नव्हते. पण मनातील शंका दूर करण्यासाठी तिचे डोळे मात्र चोहीकडे भिरभिरू लागले. ती हर्षला शोधू लागली. जसजशी ती एक एक पाऊल पुढे टाकत होती तसतशी हृदयाची धडधड तीव्र होऊ लागली. थोड्याच अंतरावर गेल्यावर तिला दोन चार मुलांची उन्हात पडलेली सावली दिसली. ती अगदी निरखून त्या सावलीकडे पाहू लागली आणि अचानक घाबरून तिने तिची पाऊले मागे घेतली. हो. ती तीच सावली होती ज्याची तिला अपेक्षा