तुझी माझी यारी - 6

  • 9.2k
  • 4.2k

अंजली आज पहाटेच उठून तयार झाली होती .ड्रेस ला तर रात्रीच कडक इस्त्री करून टका टक करून ठेवला होता..ब्राऊन कलर चा पंजाबी ड्रेस त्यावर व्हाईट कलर ची ओढणी..असा ड्रेस होता त्यांच्या शाळेचा..ड्रेस घालून ती मम्मी कडून केसाची वेणी घालून घेत होती...ती मम्मीच्या पुढ्यात बसली होती आणि मम्मी तिची केस विंचरत होती. अंजली : मम्मी हळू ना...किती जोरात ओढते स केस.. मम्मी : हो झालं झालं..काय तुम्ही आज कालच्या पोरी अजिबात केसाची निगा राखायला नको .सारखं ते केस मोकळेच सोडलेले ..काय तर फॅशन म्हणे.. अंजली हळूच हसत मम्मी कडे मागे वळून पाहते .. अंजली : तो गजरा ही लाऊन दे.. मम्मी