भाग १ कोणतीही व्यक्ती जीवनात काहीही सोसल्याशिवाय मोठा माणूस बनत नाही.ती मोठी बनते तर तिच्या चांगल्या विचारांनी आणि तिच्या अनुभवी प्रसगांनी.लेखकांचेच उदाहरण बघा, आपले अनुभव ते लोकांसमोर मांडतात आणि आयुष्याचा ध्येय गाठतात.असे काही प्रसंग आपल्या आयुष्यात घडुन जातात आणि जीवनाचा कायापालटच करतात, किती भितीदायक असतात ते.तसंच काहीसं माझ्या जीवनातही घडले.आजपर्यंत मी ते विसरुही शकले नाही.तो प्रसंग मला एकदम धीट बनवून गेला.लोकांसमोर सामोरे जाण्याची ताकद मला दिली.परिस्थिती माणसाला सामोरे जायला शिकवते,ते खरंच आहे.जीवनात जगायला कोणीतरी सोबत असावं लागतं,तशी माझ्यासाठी माझी आई होती.माझ्या प्रत्येक सुखदुःखात तीच माझ्या सोबत होती. आई,