एक छोटीसी लव्ह स्टोरी - 5, 6

  • 8k
  • 1
  • 3.1k

त्या दिवसानंतर मंदार खूप बदलला. गप्प गप्प राहायचं. उगीच जास्ती कोणाच्या अध्यात मध्यात पडायचा नाही. ग्रुप मध्ये पण मोjक्या लोकांशी बोलायचा. त्यात प्रीती शी जास्ती बोलायचं प्रयत्न करायचा. पण अनुजा मुले प्रीती पण मंदार ला टाळत असायची. भेटली की थोडे फार बोलून निघून जायची. मंदार मग अजूनच उदास व्हायचा. काय होतंय आणि काय घडतय काही कळत नव्हते...अभ्यासातून लक्ष उडाले होते. अनुजा मात्र ग्रुपणपासून तुटत चालली होती. तिचा खास करून राग प्रीती वर होता. तिच्या मुळेच मंदार ने आपल्याला भाव दिला नाही असे सारखे वाटत होते तिला...सगळ्यांनी तिला खूप समजावलं पण ती कोणाचे ऐकत नव्हती. प्रितिशी तर बोलणे सोडून दिले होते