गोट्या - भाग 7

  • 9k
  • 2.9k

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गोट्या आणि वडिलांनी थेट बस स्थानक गाठले आणि दुसऱ्या शहराला जाण्यास निघाले. गाडी वेगात धावत होती, त्याच वेगात गोट्याचे मन देखील धावू लागले. अनेक विचार त्याच्या डोक्यात येत होते. काय होईल आणि कसं होईल ? या विचारांच्या तंद्रीत एकदाचे चार पाच तासाच्या प्रवासानंतर त्या शहरात बस पोहोचली. दोघा-तिघांना विचारत विचारत ते कॉलेजकडे जाणाऱ्या बसजवळ जाऊन पोहोचले. शहरापासून दहा किमी दूर अंतरावर उंच डोंगरावर वसलेले एक छोटेसे गाव आणि त्या गावात ते कॉलेज होते. मुख्य रस्त्यापासून अर्धा किमी दूर कॉलेज होते. बसमधून उतरून ते पायी कॉलेजकडे निघाले. सर्वत्र नीरव शांतता होती. पक्ष्याचा तेवढा किलबिल आवाज ऐकू येत