२९ जून २०६१ - काळरात्र - 6

  • 8.7k
  • 3.6k

अनिच्या ग्लास मधली वाईन संपली. त्याची अजून वाईन घेणायची इच्छा होती. पण काहीतरी आठवल्यासारखा तो हॉलमध्ये आला आणि हंसीकाच्या समोरील खुर्चीवर बसला. हंसीकाच्या समोर असलेल्या नोटबूक मधून त्याने शेवटचं पान फाडलं आणि काळ्या मर्करने काहीतरी लिहू लागला. तो इतक्या घाईत हॉलमध्ये का आला हे बघण्यासाठी सर्वजण त्याच्या मागोमाग आले. तो काहीतरी लिहितोय असं बघून आर्या म्हणाली, “अनि, तू काय करतोयस हे?” आपली नजर कागदावरच स्थिर करत अनि म्हणाला, “मला तिथं जायला हवं. ज्या अर्थी तिथं लाइट आहे, त्याअर्थी तिथे फोनला नेटवर्क असेल किंवा इंटरनेट कनेक्शन तरी असेल. मी त्यांच्या साठी एक नोट लिहितोय आणि ही नोट मी त्या घराच्या