२९ जून २०६१ - काळरात्र - 2

  • 11.6k
  • 5.4k

सक्षम आणि शौनक एकाच कंपनीत कामाला होते. सक्षम आणि आर्याचं लव्ह मॅरेज असतं. सक्षमला आर्या त्यांच्या एका नातेवाईकांच्या लग्नात दिसलेली असते आणि तिथून त्यांची लव्हस्टोरी सुरू होते. मग बर्‍याच वेळा घरच्यांना समजवल्यावर यांच्या लग्नाला होकार मिळून ते आता सुखाने नांदत असतात. आर्या एक निष्णात फार्मसीस्ट होती. ती ‘वर्ल्ड फार्मा टूडे’ नावाच्या मॅगझीन मध्ये लिहायची. त्याचप्रमाणे तिचा ड्रग्जवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास होता. सक्षम आणि आर्याचा कोरेगांव पार्कला एक छान बंगला होता. आजची पार्टी तिथेच होती. “मृगजळ”मध्ये. हंसीका येण्याआधी तिथे नीलिमा आणि अनि पोहोचले होते. अनिचा रियल इस्टेटचा बिझनेस होता. त्याचा बिझनेस असल्यामुळे वेळेच्या बाबतीत तो अगदी फ्लेक्सिबल होता.