तुझा स्पर्श...

  • 25.9k
  • 9.6k

सगळ्यांची नजर चुकवून तुझे माझ्याकडे पाहणे अन् मी ही तुझ्याकडे हळूच चोरून बघणे मग नकळत आपली नजर भिडणे अन् लाजेने माझ्या काळजाचं पाणी पाणी होणे असा तुझ्या नजरेचा स्पर्श...तू माझ्यासोबत अगदी पहिल्यांदाच बोलणे काय बोलावे हे दोघांनाही न सुचणे मग बोलता बोलता आपल्या दोघांचेही निःशब्द होणे अन् हळूच एकमेकांच्या डोळ्यांत स्वतःची प्रतिमा पाहणे असा तुझ्या अबोल भावनांचा स्पर्शसकाळी डोळे उघडताच फक्त तुझा विचार मनात येणे मग मोबाईल हाती घेऊन पहिला मेसेज तुला करणे तुझ्या रिप्लायची वाट बघता बघता आधीचे सर्व मेसेज वाचणे अन् गालातल्या गालात माझे सुंदर हसणे असा तुझ्या शब्दांचा स्पर्श...तुझ्या फोनची मी सतत वाट पाहणे मग तासंतास तुझा