जोडी तुझी माझी - भाग 33

(12)
  • 10.5k
  • 5.4k

विवेक तिला एका टेकडीवर, निसर्गरम्य ठिकाणी घेऊन गेला... तिथे जाताच तिची सगळी मरगळ दूर झाली आणि तिला फ्रेश वाटू लागलं... थोडावेळ निसर्गाच्या, इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर विवेक ने आपला विषय हाती घेतला.. टेकडीवर एका मोठ्या दगडावर दोघेही बसले होते... विवेक तिच्याकडे बघत बोलू लागला..विवेक - गौरवी, मला जे सांगायचं आहे ते बोलू का??गौरवी - हम्म, त्यासाठी तर आलोय ना... तुझं ऐकून घेणार आहे मी.. विवेक - थँक्स, गौरवी खर तर मी हे सगळं तुला आधीच सांगणार होतो पण ते सांगण्या आधीच तुला ते कळलं आणि तेही खूप विचित्र पद्धतीने... मी आणि आयशा एका पार्टी मध्ये भेटलो जवळपास 4 वर्षाआधी. त्यानंतर