जोडी तुझी माझी - भाग 31

  • 11k
  • 5.9k

गौरवी - तुला बोलायचं आहे ना माझ्याशी!!! ठीक आहे बोल.. पुन्हा तुझी तक्रार नको कि तुझं एकदाही ऐकून घेतलं नाही... बघू तरी अस काय सांगणार आहे तू मला नवीन जे मला माहिती नाही...विवेक - आता बोलू का? तू बरी हो ना आधी मग बोलूयात ना निवांत... सद्धे तुला आरामाची गरज आहे... उगाच हा विषय नको... त्रास होईल ग तुला...गौरवी - त्रास आजही होणार आहे, उद्याही होणारच आहे आणि आता मला त्रास होत नाहीय अस वाटत का? तुला पुढे पाहून मी जे विसरायचा प्रयत्न करत होते ते आणखी परत परत आठवतंय मला, स्वतःचाच राग येतोय की एवढं सगळं घडत असतानाही मी