दुभंगून जाता जाता... - 10 - अंतिम भाग

  • 5.8k
  • 2.1k

10 आजवर घडलेल्या घटना – प्रसंगांनी मी मजबूत झालो होतो. मी जिद्द सोडली नव्हती. मला पुन्हा संघर्षाला सज्ज व्हायचं होतं. मी डॉ. केसरकर सर आणि सुलभा ताईंचा निरोप घेण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. डॉ. केसरकर सरांना आणि सुलभाताईंना मी नमस्कार केला. आणि म्हणालो... आजवर आपण मला सांभाळलं आई – वडिलांचं प्रेम दिलं. आपण मला खूप मदत केली. आपले उपकार मी कधीही विसरू शकणार नाही. मी कायमच आपल्या ऋणात राहीन. यावर केसरकर सर म्हणाले... एका बाजूला तुम्ही आम्हांला आई – वडील मानत असताना, कोणत्या ऋणाची आणि उपकाराची भाषा बोलताय...? तुम्ही कुठंही जाणार नाही. तुमच्या राहण्या – जेवणाची सोय आम्ही आमच्या विद्यार्थी वसतीगृहात