स्त्री ...... आज घरात खूप आनंदी वातावरण होत .कारण ही तसंच होत मधुसूदन आणि राधा च्या आयुष्यात नवीन पाहुण्याचं आगमन होणार होत ..मधुसूदन तर अगदी कानात जीव आणून डॉक्टर येण्याच्या प्रतीक्षेत होता ..कधी एकदा आपल्या प्रिय राधेला आणि नवीन जीवाला भेटतो असं त्याला झालं होत...थोड्यावेळातच नर्स ताई आल्या आणि मधुसुदनच्या हातात कपड्यात गुंडाळलेला इवाला जीव ठेवत त्याच अभिनंदन करत म्हणाल्या लक्ष्मी आली तुमच्या घरी......मधुसूदन अगदी भान हरपून आपल्या लेकीला न्याहाळू लागला ....त्याचा आनंद आपोआप डोळ्यातून गालावर ओघळला ....त्याच्या घराचे सर्व मंडळी एव्हाना हॉस्पिटल मध्ये पोहचले होते....सर्वजण आनंदी होते