काशी - 10 - अंतिम भाग

  • 7.7k
  • 2.9k

प्रकरण १०  सकाळ पासून आजीची तब्येत नाजूकच वाटत होती. खोकल्याची उबळ आली कि थांबतच नव्हती. त्यामुळे तिला श्वास घ्यायलाहि फार जड वाटत होते. त्यामुळे डॉक्टरांनी तिला ऑक्सिजनवर ठेवले होते. आजी डोळे उघडून कोणाच्या तरी प्रतीक्षेत होती असे तिच्या चेहेऱ्यावरच्या हावभावावरून वाटत होते. म्हणून नर्सने फोन करून सरांना बोलावून घेतले.  सर येताच तिच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता दिसली. "  आर तू असलास कि मला खूप धीर आल्यासारखा वाटतो. तू माझ्या बाजूलाच बसून राहा---माझं लक्षण काही ठीक दिसत नाही तरी सुद्धा ज्ञानूला पाहिल्या शिवाय मी डोळे मिटणार नाही---"   हे ऐकून नर्स म्हणाली " सर, हा ज्ञानू यांचा मुलगा आहे कां---त्यांचा सगळा जीव त्यांच्या