बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 10 - अंतिम भाग

(24)
  • 10.9k
  • 1
  • 4.7k

१०. निशाणाचा हत्ती             तोरण्यापाठोपाठ त्याच्या जवळचा मुरुंबदेवाचा डोंगरही थोडासा प्रतिकार करताच हाती लागला. तोरण्यावर राजांना हिरा, मोहरांनी भरलेले हंडे सापडले. गडांच्या डागडुजीसाठी तोरणेश्वराचा आशीर्वाद मिळाला. राजांनी बुद्धी चातुर्याच्या जोरावर लढाई न करताही चाकण, पुरंदर, तिकोना आणि आजुबाजुचा परिसरही आपल्या अधिपत्याखाली आणला. रायरेश्वराजवळचा रोहिडा किल्लाही जास्तीचा विरोध न करता आपला केला. रोहीड्यावर राजांनी बाजी - फुलाजी हि प्रभू देशपांड्यांची जोडी तर जावळी खोऱ्यामध्ये मुरारबाजी असे एकना अनेक हिरे आपले केले. बाजी पासलकरांच्या आन कान्होजी जेधेंच्या सेनाधिपत्याखाली फतेहखानाची स्वारीही यशस्वीपणे परतवून लावली. पण या वेळी स्वराज्यासाठी पहिले बलिदान बाजी पासलकर आपल्या नावावर करून गेले.