सुवर्णमती - 7

  • 6.9k
  • 1
  • 3k

7 घोडसवार निघाले. सर्वात पुढे सुवर्णमती होती. पाठोपाठ चंद्रनाग, सूर्यनाग, त्यांच्यामागे सख्या, सेविका आणि सैनिक काही अंतर ठेवून निघाले. राजे आणि राण्याही निघाले, परंतु ते प्रथम नगराचा फेरफटका मारून मग वनी पोहोचणार होते. जरा पुढे गेल्यानंतर सुवर्णमतीने सूर्यनागाकडे एक कटाक्ष टाकला. तो परिसराचे बारीक निरीक्षण करण्यात गुंतल्याचे तिला दिसले. किंचित दुखावलेल्या अहंकाराने, तिने चंद्रनागास शर्यत लावण्यास सांगितले. तोही ताबडतोब तयार झाला. सूर्यनाग सर्व बोलणे ऐकत होता, पण तो काहीच बोलला नाही. सुवर्णमतीने घोड्यास टाच दिली. चंद्रनागानेही घोड्यास टाच दिली. वेग वाढत गेला. सर्वांमधे आणि या दोघांमधले अंतर वाढत गेले. सूर्यनाग त्यांच्याबरोबरीने, किंवा खरंतर त्यांच्या पुढे, जाऊ शकत होता, पण