सुवर्णमती - 5

  • 7.5k
  • 3.3k

5 तिच्या नाजूक कंकणांनी आधीच तिच्या येण्याची वर्दी दिली. नकळत सर्वांच्याच नजरा प्रवेशद्वारावर आधीच खिळल्या होत्या. सुवर्णमतीचे पहिले पाऊल आत पडताच दोन्ही कुवंर, झटकन आसनावरून उठून उभे राहिले. यात शिष्टाचाराचा भाग किती आणि सुवर्णमतीच्या सौंदर्याचा किती, हे त्यांचे त्यांनाही सांगणे जमले नसते. सुवर्णमतीच्या सौंदर्याची ख्याती आधीच त्यांच्यापर्यंत पोहोचली होती, पण तरीही, समोर जी स्वर्गीय सौंदर्यखणी उभी होती तिला पाहताच आपण जे वर्णन ऐकले, ते किती अपूरे आणि तोकडे होते असेच त्या चौघांनाही वाटले. सूर्यनाग क्षणभर अवाक होऊन, तिच्या तेजस्वी सुंदर मुखाकडे पाहतच राहिला. एक अत्यंत अनोखी लहर त्याच्या शरीरभर उमटली. मनोमन 'हीच ती, जिची छबी तारुण्यात प्रवेश केल्यापासून आपल्या