सुवर्णमती - 3

  • 7.3k
  • 3.7k

3 आजचा दिवस होताच तसा विशेष! कन्या उपवर झाली की सर्व मायबापाना असते तशी हुरहूर महाराज आणि राणीसरकारांनाही होती. पोटची एकुलती एक सौंदर्यवती, गुणवती, कन्या, तिच्या रुपाला, बुद्धीमत्तेला साजेसा अनुरूप वर मिळणे गरजेचे होतेच, पण त्याचबरोबर या राज्याची चढती कमान तशीच उत्तुंग ठेवायला लायक असा जमाईराजाही राज्याला हवा होता. महाराजांना आपल्या कन्येच्या कुवतीचा आणि महत्वाकांक्षेचा अंदाज आणि अभिमान दोन्ही होते. परंतु जनतेला "राजा" हवा असतो राज्यकर्ता म्हणून, हेही ते जाणून होते. अनेकांनी सुचवूनही दत्तकविधान करण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नव्हता तो केवळ सुवर्णमतीच्या अफाट बुद्धीमत्तेवरच्या असलेल्या त्यांच्या विश्वासावर. आज राजे शेषनाग त्यांच्या पत्नी आणि दोन पुत्रांसह गंगानगरीत येणार