सुवर्णमती - 1

  • 12.1k
  • 1
  • 6.5k

उपोद्घात / पूर्वपीठिका 1 गंगानगरीच्या राजदरबारात अस्वस्थ शांतता पसरली होती. काही दिवसांपूर्वी हेर खबर घेऊन आला होता. शेजारच्या पंचमनगरी राज्याने गंगानगरीवर आक्रमण करण्याची तयारी सुरू केली होती. गंगानगरीचे सैनिक प्राण पणाला लावून झुंजले असते पण पंचमनगरीच्या सैन्याकडे परकीयांनी पुरवलेल्या लांब पल्ल्याच्या तोफा, बंदुका आणि दारूगोळा होता.