कादंबरी - प्रेमाची जादू - भाग -२५ वा

  • 7.5k
  • 3.6k

कादंबरी – प्रेमाची जादू भाग – २५ वा --------------------------------------------------- यश तसा तर मधुराला त्याच्या ऑफिसमध्ये रोज पाहत होता , बोलत होता ,ऑफिस मध्ये सगळ्याच स्टाफ सोबत तो बोलायचा , त्यापेक्षा काही वेगळे असे तो बोलत नसे . पण दिदिसोबत मधुरा त्याच्या आजी- आजोबांना भेटायला घरी येऊन गेल्यापासून यशच्या मनात तिच्याविषयी अजून खूप काही वेगळे वाटण्यास सुरुवात झाली होती .. अशी भावना मनाला किती छान वाटणारी आहे ..हे त्याने अनुभवले होते. अजून तो त्याच संध्याकाळच्या आठवणीत हरवून जात होता .. किती छान ,सुरेख क्षण होते ते .. वाटते ..तो दिवस खूपच लहान होता, लगेच संपला . यशला ते सारे पुन्हा पुन्हा