ती रात्र - 7

  • 14.4k
  • 7.2k

मी शुद्धीवर आलो तेव्हा माया माझ्या समोर बसली होती. मायाने हळूच मला उठवले आणि एका डेस्क वर बसवले. बॅग मधून पाणी काढले, मला पाजले. मी एका हाताने खांद्याला लागलेली जखम दाबली होती. माया च लक्ष त्याकडे गेलं, तिने तिच्या रुमालाने ती जखम बांधली. माझ्या बाजूला बसली आणि हळुवार पणे तिने माझं डोकं तिच्या मांडीवर घेतलं, डोक्यावर हात फिरवत मला बोलली. “श्रेयस तू ठीक आहे ना आता ?”मी, “हो, पण तू का अशी वागते आहे. मी तुला खूप चांगली मैत्रीण समजत होतो. पण तू का अशी वागली माझ्याबरोबर, मी कधीच तुला प्रेम करतो असं काही बोललो नाही.”ती, “शांत हो, तुझी काही