ती रात्र - 5

  • 17.3k
  • 9.3k

त्या दिवसानंतर माया जास्त एकरूप होऊन बोलायला लागली. जसं काही ती माझ्या प्रेमात आहे आणि आम्ही दोघेही प्रेमाच्या नात्यात बांधले गेलो. ती माझ्याबरोबर बोलतांना पिल्लू , बच्चा असे शब्द वापरायला लागली होती. मला सुरवातीला वाटायचं की ती बालिश आहे म्हणून अस काही बोलत असणार पण कालांतराने मला त्या शब्दांचा राग यायला लागला होता.जेव्हा आम्ही कधी भेटायचो तेव्हा ती माझ्या अगदी जवळ यायचा प्रयत्न करायची, मला तिच्या स्पर्शाचा त्रास नाही, फक्त त्या मागच्या भावनेचा त्रास होत असे. कारण त्या स्पर्शात मैत्री कुठेच दिसत नव्हती.एके दिवशी मायाचा सकाळी मेसेज आला. “तिकिटे काढली का ?”मी विचार केला कोणत्या तिकितांबद्दल बोलते आहे ही ,