राज-का-रण (खाडी पट्टयातील ढाण्या वाघ) भाग-२

  • 10.1k
  • 2.9k

रम्या सिनियर कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली, झेंडे साहेबांनी पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या सभेला त्याला बोलावले, सभेत निवडणूक प्रचाराच्या कार्यक्रमसंबंधी चर्चा झाली खाडी पट्यात खूप कायकर्ते होते पण धडाडीने काम करणारा असा कोणी नव्हता तसा आमदार साहेब आणि तालुका प्रमुखांचे तिथे वर्चस्व होते पण गाफील राहून चालणार नव्हते कारण भाऊसाहेब विरुद्ध पक्षात गेल्यामुळे तिकडे गडबड करण्याची शक्यता होती. सभेत सगळ्यांना आश्चर्यचकित करणारी घोषणा तालुका प्रमुख राजे साहेबांनी केली " झेंडे साहेब आणि मी मिळून एक निर्णय घेतलाय, खाडी पट्यात विशेष कार्यशील कार्यकर्ता सध्या तरी जुन्यापैकी नाही म्हणून तरुण कार्यकर्त्याला संधी म्हणून रमेश नाचणे याला निवडणूक प्रचार