दारावे रायगड जिल्ह्यातील खाडी पट्यातील एक खेडेगाव, समुद्राच्या खाडीच्या किनारी असणाऱ्या गावांना खाडी पट्यातील गावे असे कोकणात म्हटले जाते,तीनशे-साडेतीनशे उंबरठ्याचे हे गाव, शेती आणि काहीसा समुद्र किनारा असल्याने मासेमारी हे इतकेच उदरनिर्वाहाचे साधन त्यामुळे बरेचसे लोक गाव सोडून मुंबईसारख्या शहरात तर कोणी तालुक्यात नोकरी-धंद्यानिमित्त स्थायिक झालेले. याच गावात गणपत नाचणे हा रहिवासी आपली वृद्ध आई, पत्नी आणि दोन मुले यांच्यासह राहत असे, लहान भाऊ सदानंद कुटुंबासह मुंबईत स्थायिक झालेला. गणपतचे शिक्षण नसल्याने त्याने गावी राहून कुटुंबाचे पालन पोषण करण्याचा पर्याय निवडलेला, कुटुंबाचे भागेल इतकी शेती आणि आठवडी बाजारात तालुक्याला सुकी मच्छी विकण्याचे काम करायचा. मोठा मुलगा रम्या(खरे नाव रमेश