“ बे एकं बे , बे दुनं चारं, बे तिरकं सहा...” असं पाढ्यांचं पालुपद राणी झोपडीच्या एका कोप-यात बसून करत होती. दुर्गीनं कौतुकानं आपल्या पोरीकडं बघीतलं आणि ती कपडे धुवायला दारात बसली. दुर्गीचा दोन वर्षाचा लहान मुलगा बाळू राणीच्या आजूबाजूला बागडत होता. अचानक राणीला काहीतरी आठवले व ती दारात कपडे धुणा-या दुर्गीला म्हणाली, ”आय ये आय, ऐक की गं ! माझी साळा कवा चालू व्हनार हाय ? ” दुर्गी म्हणाली , “आता व्हनार की चालू. मग माझी बाय साळत जाईल, अब्यास करीलं ! ” असं म्हणत दुर्गीनं मायेने राणीच्या चेह-यावरून हात फिरवला व आपल्या कानसुलाजवळ कडाकड बोटं मोडली. आईचं