8 खरंतर कुठंतरी स्थिर व्हावं, चांगली नोकरी मिळावी आणि इतरांसारखं आपलंही घर व्हावं. छान छोटंसं कुटुंब असावं ही स्वप्न पाहण्याचं ते वय होतं. मी लहान होतो तेव्हा शाळेत पालक मिटिंग असायची वर्गातील इतर मुलांचे पालक आलेले पाहून मनाला वाटायचं आपलंही कुणीतरी असायला हवं होतं. आज थोडेफार कमवायला लागलो असलो तरी ते पोरकंपण अजूनही संपल नव्हतं. पैशापेक्षा मानसिक आधार आणि मायेच्या सावलीची खरी गरज असते. याची जाणीव मला त्यावेळी झाली. ज्यावेळी मी स्टेजवर बक्षीस घ्यायला जायचो त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट व्हायचा आणि त्या समोरच्या गर्दीत मी आई – बाबांचा, आजी – आजोबांचा चेहरा शोधत रहायचो. आज अनेकांचे आई-बाबा आपल्या मुलांचे कौतुक करायला,