5 जोमाने आणि नव्या उमेदीने अभ्यासाला सुरुवात केली. पण आयुष्यचं पूर्ण खाचखळग्यांनी आणि संघर्षानी भरलेलं असेल तर नियतीच्या पुढे कुणाचं काय चालणार आहे. ते वय आकर्षणाचं, आपल्या जवळच्या कुणाजवळ तरी मन मोकळं करावसं वाटणार. धुंध – बेधुंद होऊन स्वप्नात भरारी घेण्याचं. या धोक्याच्या वयातून मार्गक्रमण करत असताना... या मार्गावरती कुणीतरी जिवाभावाचं भेटलं तर मग जणू आपल्या मोकळ्या भावनांना पंखच फुटू लागतात. मलाही तसे पंख फुटले हे खरं पण भरारी घेण्याअगोदरच कुणीतरी छाटल्यामुळे परिस्थितीने मेलेल्या माणसाला मन, भावना नसतात. त्याला प्रेम करायचा अधिकार नसतो याची जाणीव झाली. तसं ते प्रेम नव्हतंच बालवयातलं आकर्षण होतं आणि आमच्या दृष्टीने त्याचं दुसरं नाव मैत्री