दुभंगून जाता जाता... - 3

  • 5.6k
  • 2.3k

3 घडलेल्या घटनेने आणि झालेल्या प्रकाराने आजी – आजोबा व्यथित झाले होते. मामाच्या या अशा वर्तणूकीने ते त्रस्त झाले होते. मामापुढे आजी - आजोबांचा नाईलाज झाला होता. वृद्धत्व आणि आजारपण यामुळे ते असहाय्य झाले होते. एकुलता एक मुलगा आणि मुलावर असलेल्या प्रेमापायी ते कोणतेही कठोर पाऊल उचलू शकत नव्हते. निरोप देण्याची वेळ झाली तशी आजोबांचे डोळे भरून आले. जाधव सरांना हात जोडून आजोबा म्हणाले... सर, पोराकडे लक्ष असू दे... आता तुम्हीच याचे आई – वडील. आता आम्ही किती दिवस जगणार... असं म्हणता म्हणता आजोबांचा आवाज कापरा झाला. आजोबांनी सरांच्या पायावर डोके ठेवले. आजही तो प्रसंग मला अस्वस्थ करतो. सरांनी आजोबांना