दुभंगून जाता जाता... - 2

  • 5.6k
  • 2.5k

2 आजोबा या सगळ्या घटनेतून थोडेफार सावरले होते. पण आजी मात्र मी नसताना, माझ्या माघारी आईची आठवण काढून रडायची. शेजारच्या बायकांसमोर आपलं दु:ख हलकं करायची. माझ्या पोराला माझ्या माघारी कुणाचा आधार नाही. कसं व्हायचं माझ्या राजूचं. या विचारानं ती चिंताग्रस्त व्हायची. ती माझ्या भविष्याची खूपच काळजी करायची. आजोबांचंही याच्यापेक्षा काही वेगळं नव्हतं. आजकाल ते दोघेही खुपचं चिंताग्रस्त होते. कारण थोडं वेगळं होतं. खरंतर सुरुवातीपासूनच माझा स्विकार करण्याला – माझा सांभाळ करण्याला मामांचा विरोध होता. पण आजी – आजोबांनी मामांची समजूत काढली. माझ्या आई – बाबांचा संसार सुरळीत सुरु झाल्यानंतर आणि दोघांमधील भांडणतंटा थोडासा कमी झाल्यावर परत मला आई – वडिलांच्याकडे