मी एक मोलकरीण - 9

  • 11k
  • 5k

(भाग 9) आजपासून केस माझ्या हातात होती. मी सर्व शोध नव्याने करण्याचे ठरवलं. केस ची फाईल बघून कळलं की आधी मुलगी महिनाभर गायब होती नंतर तिच्या वर अत्याचार करून तिला एका ठिकाणी फेकून दिले होते. हि पुर्ण केस मला सुमाची आठवण करून देत होती फरक इतकाच होता सुमा वयाने लहान होती आणि हि मुलगी वयाने वीस वर्षाची होती. मला आधी मुलीची सर्व माहिती नव्याने हवी होती म्हणून तिच्या घरी जाण्याचे ठरवले. मी आणि एक पोलिस ऑफीसर दोघेही तिच्या घरी पोहचलो. घर जास्त मोठ नव्हतं आणि छोटं ही नव्हतं, मध्यम आकाराच होतं. आम्ही घरामध्ये गेलो तर घरामध्ये फक्त तिचे आई बाबाच