मी एक मोलकरीण - 2

  • 13.1k
  • 7.6k

( भाग 2) आज मी एक विद्यार्थी तर होतेच पण घरकाम करणारी मुलगी म्हणून जास्त होते. आईसाठी मी मोलकरीण म्हणून जगणे लाजास्पद होते पण त्या ही पेक्षा चिंताजनक होते. तिला माझं भविष्य तिच्यासारख नको होतं. ती वारंवार मला अभ्यास करायला लावी. पण तिला सुमा जाण्याचा धक्का जास्त लागला होता म्हणून तिला मी कामाला जाण्यासाठी मनाई केली होती. तिचा नाईलाज होता पण ती खचून गेली होती. मी सहा महिने शाळा आणि घरकाम व्यवस्थित पार पाडले. आईने स्वतःला पूर्णपणे सावरले होते फक्त माझ्यासाठी आणि मदनसाठी ! या सर्व मध्ये मी आता सातवीमध्ये गेले आणि आता मला शिष्यवृत्तीची परीक्षा हि होती. मी काहीही