भाग – 9 अनु व आई बाबा गेल्यानंतर सानिका तिथेच बाहेर बसली होती. तिच्या मनात विचारांचे मंथन सुरु होते - कशा काही क्षुल्लक गोष्टींमुळे - कारणांमुळे इतके छान नाते तुटले, इतक्या वर्षांची मैत्री तुटली. का ? तर निव्वळ गैरसमजातून ? गैरसमज ! हं, कोणतेही नाते टिकवण्यासाठी त्यातील विश्वास महत्वाचा असतो तरच ते नाते मजबूत राहते परंतु गैरसमजामुळे मनात थोडी जरी शंका आली तरी ते नाते कोलमडायला सुरुवात होते आणि शेवटी तिथेच ते संपते. परंतु आमच्या बाबतीत बघायचे झाले तर नाते घट्ट होते फक्त थोडासा विश्वास कमी पडला होता त्याचाच कोणीतरी फायदा घेऊन आम्हाला असे जाणून बुजून वेगळे केले. पण