भाग – ८ सायंकाळ होत आली होती. प्रार्थनेची वेळ जवळ येत होती. महाजन काकांनी तसं सांगितलं. सर्वजण उठून मग हळूहळू मंदिराकडे जाऊ लागले. आज महाजन काकांचा दिवस होता. आज फक्त तेच बोलणार होते आणि बाकी सर्वजण ऐकणार होते. प्रार्थनेला अजून काही वेळ होता आणि कुणी आलं नव्हतं त्यामुळे जोशीकाकांनी अतिशय उत्कंठेने विचारलं, “मग पुढे काय झालं?” महाजन काकांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, “जोशी, अरे दिवसभर लेक्चर देऊन दामलोय मी. कॉलेजमध्ये शिकवायला असतांनासुद्धा इतका बोललो नव्हतो कधी.” त्यांच्या ह्या वाक्यावर सर्व मंडळी खळखळून हसू लागली. त्यांना असं हसताना पाहून बर्वेकाकू जवळ आल्या आणि बर्वेकाकांना म्हणल्या, “काय चाललंय आज? आम्हाला कळू तरी