भाग – ४ दुर कुठेतरी पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. दाट धुकं पडलं होतं. गुलाबी थंडी सर्वांना सुस्तवून सोडत होती. सूर्य नेहमीप्रमाणे उगवला होता. नव्हे, तो त्याच्या जागेवर अनादि काळापासून अविचल आणि अविरतपणे होता तसाच होता. एखाद्या चक्रवर्ती सम्राटासारखा. खरं तर पृथ्वी त्याच्याभोवती फिरते आणि आपल्याला वाटतं सूर्य उगवला. पृथ्वी फिरते हे माहीत असूनही सगळे सूर्य उगवला असंच म्हणतात. त्रिकालबाधित सत्य असूनही ते नाकरतात. आयुष्याचं सुद्धा असंच नाही का? एक वेळ अशी येणार आहे की जेव्हा आपण या जगात नसू, आठवणी असतील पण काही काळाने काळपुरुष त्यांना आपली शिकार बनवेल. हे सर्व सृष्टीला ज्ञात आहे. पण तरीही मायमोहाची लक्तरं काही गळून