भाग – २ सकाळची वेळ होती. साधारणतः नऊ वाजले होते. हवेत अजूनही बर्यापैकी गारवा जाणवत होता. इतक्यात पटांगणात एक इनोव्हा येऊन उभी राहिली. सगळ्यांचे लक्ष तिकडे वेधलं गेलं. अर्थातच त्या गाडीतून त्यांच्यामध्ये सामील व्हायला कुणीतरी आलं होतं. पुणे पासींगची गाडी होती. सामनसुद्धा भरपूर होता. महाजन, बर्वे वगैरे काका मंडळी दुरूनच गंमत बघत होती. गाडीचं मधलं दार उघडलं गेलं. त्यातून एक साधारणतः पासष्ट वगैरे वयाची महिला उतरली. पांढरे केस, कपाळावर गोंदलेल्याचा छोटासा हिरवा ठिपका भ्रुकुटीमध्यच्या अगदी थोडासा वर, हातात एक चांदीची अंगठी सोडली तर काहीही आभूषणं नव्हती. खोल गेलेले डोळे, पाठीला किंचितसा बाक कदाचित संसारगाडा ओढताना आलेला असावा असं चेहर्यावरून दिसत