काशी - 8

  • 6.9k
  • 3k

प्रकरण ८ माझे शिक्षण होतं होते. वारंवार मनातून त्या पेपर विक्रेत्याचे आभार मानत होतो. वय लहान असले तरी अनुभवाने मला समज फार आली होती. माझे तर जीवन सुरळीत झाले होते. परंतु रात्री झोपतेवेळी काशीची खूप आठवण येत होती. काशी कुठे असेल---काय करत असेल---? तिला कोणी चांगली लोकं भेटली असतील कां---? या विचाराने कधी कधी झोपही येत नसे. मला चांगली नवीन माणसं भेटली होती. नवीन ओळखी, नवा परिसर, नवीन शाळकरी जीवन त्यामुळे मी एकीकडे आनंदीहि असे.खटकत होता तो म्हणजे माय-बापूचा दुरावा---त्यांची खूप आठवण यायची. परंतु मी कुठल्या गावी राहत होतो----माझ्या झोपडपट्टीचे नावही माहित नव्हते---यापासून मी एकदम अडाणी होतो. बघता बघता