काशी - 7

  • 7.5k
  • 3.1k

प्रकरण ७ सरांना राजुने जेवण आणून दिले. जेवण करून सरांनी आश्रमाचा हिशोबाचा आढावा घेण्यास रजिस्टर हातात घेतले. परंतु मन हे भूतकाळातील घटनांकडे वेढू लागले होते. हळू हळू आठवणींचा वेढा मनाला जास्तच घट्ट घट्ट होऊ लागला. ते उठले आणि त्यांनी कपाटातून काशीच्या गळ्यातील तुटलेला आणि चिखलात पडलेला ताईत काढून त्याकडे एक टक बघत राहिले. अजूनही त्या ताईत वरचा चिखल सुकला असला तरी त्यातील आठवणी या ओल्या होत्या. काशीला तो चिखलात पडलेला ताईत नको होता. म्हणून मी माझ्या गळ्यातील ताईत तिच्या गळ्यात घालून तिचा ताईत मी माझ्या खिशात ठेवून दिला होता. त्याला काशीची आठवण म्हणून मी आजवर जपून ठेवला. आज मी