काशी - 6

  • 8.3k
  • 3k

प्रकरण ६ दुसऱ्या दिवशी सर आणि राम व मनोज चंदू व लक्ष्मीला आणायला निघाले. चंदू व लक्ष्मी तयार होऊन नाक्यावर उभे राहून सरांची वाटच बघत उभे होते. त्यांच्या बरोबर त्यांचे बाजूला राहणारे वयस्कर चाचा सुद्धा उभे होते. राजुने गाडी साईडला घेतली. सर गाडीबाहेर उतरताच त्यांच्या चाचाने सरांचे पाय धरले. अरेरे---हे काय करता---? तुमचे लई उपकार हायेत साब---या मुलांचे माय-बाप देवाघरी गेले---मी तर त्यांच्या बाजूला राहतो.या मुलांना बघून लई जीव कासावीस व्हतो---मी किती दिवस या मुलांना बघणार---?मी आज आहे तर उद्या नाही. एकदा मी माझ्या डोळ्याने बघीन कि हि लेकरं सुरक्षित हायेत तवा माझे